एसआरए घोटाळ्यातील आरोपींचा नार्को टेस्ट करा – धनंजय मुंडे

एसआरए घोटाळ्यातील आरोपींचा नार्को टेस्ट करा – धनंजय मुंडे

मुंबई – मुंबईत विक्रोळीतील एका एसआरए स्कीममध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांनी केला आहे. त्याचे स्टिंगच त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांना दिले. त्याची बातमी टीव्ही चॅनलवरुन येताच एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान येवले यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे त्याची चौकशी करुन आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंयज मुंडे यांनी केली आहे.  निवृत्त सीईओ विश्वास पाटील आणि ओंकार बिल्डर्सच्या संचालकांची नार्को टेस्ट करण्याची मागणी मुंडे यांनी केली आहे. या प्रकरणी ओंकार बिल्डर्सला दिलेल्या प्रकल्पांना तातडीने स्थगिती देण्याची मागणीही मुंडे यांनी केली आहे. तसंच हे प्रकरण गंभीर असल्यामुळे सरकारने तातडीने संदीप येवले यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणीही धनंजय मुंडे यांनी केली आहे.

COMMENTS