अडचणीत सापडलेल्या शेतक-यांवर सहकार विभागाची कु-हाड !

अडचणीत सापडलेल्या शेतक-यांवर सहकार विभागाची कु-हाड !

मुंबई – कर्जबाजारीमुळे संकटात सापडलेल्या शेतक-यांना कर्जमाफीच तर दूरच उलट त्यांच्यावर सहकार विभागने कु-हाड चालवण्याचा प्रकारच सरकारने त्यांच्या निर्णयातून घेतला आहे. कर्ज वसुलीसाठी सहकार विभागाने फतवा काढला आहे. पिक विम्याच्या रकमेतून ५० टक्के रक्कम पिक कर्जाची वसुली करून घ्यावी असे परिपत्रक राज्य सरकारच्या सहकार खात्याने काढले आहे. वसुलीचे हे परिपत्रक जिल्हा बॅंकांना पाठवले आहे. कर्ज वसुली होत नसल्याने अडचणीत असलेल्या बॅंकांच्या मदतीसाठी सहकार विभागाचा निर्णय घेतल्याचा दावा सरकारतर्फे केला जात आहे. सरकारने काढलेले परिपत्रक सोबत जोडले आहे.

COMMENTS