राज्यात 3884 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू

राज्यात 3884 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू

मुंबई : राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे. या टप्प्यात १८ जिल्ह्यातील ३ हजार ८८४ ग्रामपंयाचतीमध्ये मतदान सुरू झालंय.
आज मतदान होत असलेल्या जिल्हानिहाय ग्राम पंचायती अशा : नाशिक १७०, धुळे १०८, जळगाव १३८, नंदुरबार ५१, अहमदनगर २०४, औरंगाबाद २१२, बीड ७०३, नांदेड १७१, परभणी १२६, उस्मानाबाद- १६५, जालना- २४०, लातूर- ३५३, हिंगोली- ४९,अमरावती- २६२, अकोला- २७२, यवतमाळ- ९३, वाशीम- २८७ आणि बुलडाणा- २८०. एकूण- ३८८४
पहिल्या टप्प्यातील ग्रामपंयायती मतमोजणी ९ तारखेला होणार आहे. दुसऱ्या टप्प्याततील मतदान १४ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामध्ये 16 जिल्ह्यातील 3 हजार 692 ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल.

COMMENTS