मनोहर पर्रिकर यांच्या गोव्यातील लेट नाईट पार्टीवर बडगा

मनोहर पर्रिकर यांच्या गोव्यातील लेट नाईट पार्टीवर बडगा

संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामा देऊन गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले मनोहर पर्रिकर यांनी धाडसी निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. पर्रिकर यांनी आता थेट लेट नाईट पार्टीवर बडगा उचला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गोव्यात रात्री दहाच्या पुढे पार्टी करण्यास कायद्याने बंदी असल्याची माहिती पर्रिकर यांनी माध्यमांना दिली. सत्तेवर आल्यापासून मंत्रिमंडळातील काही सदस्यांनी लेट नाईट पार्टीवर बंदीची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर पर्रिकरांनी हा निर्णय घेतला आहे.  

पर्रिकर मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री विनोद पालियेकर यांनी गोव्यातील लेट नाईट आणि रेव्ह पार्टीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. पोलिसांच्या सहकार्यानेच राज्यातील समुद्रकिनारपट्टीवर मोठ्याप्रमाणात अमली पदार्थाची विक्री होते, असा गंभीर आरोप त्यांनी केली.

COMMENTS