दिव्यांग युवक बनला थेट सरपंच !

दिव्यांग युवक बनला थेट सरपंच !

वाशिम – वाशिम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेंदुरजना मोरे येथे कोणतेही राजकीय वलय नसलेल्या एका 22 वर्षीय तरुणाला गावकऱ्यांनी सरपंचपदी विराजमान केले आहे.  गावात केवळ त्याच्या समाजाचे एकच घर असतांना केवळ त्याच्या मनमिळावू स्वभावामुळे जनतेनी २२ वर्षिय दिव्यांग अविनाश अशोक धांमदे यांना निवडून दिले.

शेंदुरजना मोरे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अविनाश अशोक धांमदे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार संतोष मोरे यांच्यापेक्षा केवळ एक मताने विजय मिळविला. अविनाश यांना 522 मते पडली. अविनाश दोन्ही पायांनी अपंग असून त्यांचे शिक्षण इयत्ता आठवीपर्यंत झाले आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

 

COMMENTS